विरोधी पक्षनेत्यांना घेवून राहुल गांधीची बस सवारी

टीम महाराष्ट्र देशा – तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस जिंकल्यानंतर आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नवे सरकार स्थापन होत आहे. तिन्ही राज्यात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महाआघाडी सोबत हजेरी लावत आहेत.

मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ यांचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर छत्तीसगडच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाआघाडी छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहे. छत्तीसगडच्या दिशेने प्रवास करताना राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्यांना सोबत घेवून बसने प्रवास केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सकाळी शपथ घेतली. थोड्या वेळापूर्वी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील राहुल गांधी आणि संपूर्ण महाआघाडीच्या उपस्थितीत शपथ घेतली. तर आता थोड्याच वेळात छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेनार आहेत.