वांद्र्यातील झोपडपट्ट्यांवरील कारवाईला उच्च न्यायालयाकडून एक आठवड्याची स्थगिती

मुंबई : वांद्रे गरीबनगर परिसरातील बेकायदा झोपडपट्ट्यांवरील कारवाईला एक आठवड्याची स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज महापालिकेला दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे झोपडपट्टीवासियांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. झोपडपट्टीवर महापालिकेकडून सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका स्थानिक रहिवासी निलोफर सलीम कुरेश यांनी दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. दरम्यान गरीबनगर परिसरातील आपली कारवाई संपली असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. यावर पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. आम्ही १९९४ पासून या भागात रहात असून कारवाई पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी आमच्या झोपडपट्ट्यांवर कारवाई होऊ शकते, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...