fbpx

रेल्वे स्थानकावर आराम करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात

चेन्नई : एका घरात हात साफ केल्यावर सैदापेट रेल्वे स्थानकावर येऊन आराम करण एका चोराला चागलंचं महागात पडलं. चोर रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याला झोप लागली सकाळी सव्वा सहा वाजता गस्त घालण्यासाठी आलेल्या रेल्वे पोलिसांनी या चोराला उठवलं. पोलिसांना पाहताच चोर पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडलं.

यानंतर त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे दागिने आणि कपडे सापडले. ‘सुरुवातीला त्यानं ते दागिने त्याच्या पत्नीचे असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना पाहून पळालास का, याचं उत्तर त्याला देता आलं नाही. त्यानंतर आणखी चौकशी केल्यावर त्यानं चोरीची कबुली दिली,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

यानंतर चोराची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली आहे. या चोराकडून सोन्याची अंगठी, दोन झुमके आणि काही कपडे ताब्यात घेतले आहेत.