fbpx

राष्ट्रवादीला उमेदवारही सांभाळता आला नाही – धस

-suresh-dhas-

टीम महाराष्ट्र देशा – लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारक रित्या उमेदवारी मागे घेतली आहे. ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी या निवडणुकीचा निकाल लागल्याचा दावा करत, स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवारही सांभाळता आला नाही यापेक्षा नामुष्की ती काय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.