fbpx

रायगडऐवजी राजगडाचा फोटो ; जयंत पाटील झाले सोशल मिडीयावर ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा : १० जानेवारीपासून किल्ले रायगडावरुन राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा सुरु होणार आहे.त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडीयावर पोस्टर बाजी केली आहे. पण राष्ट्रवादी नेत्यांनी पोस्टर्समध्ये रायगडऐवजी राजगडाचा फोटो वापरला असल्याने आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना गड किल्ल्यांची पुन्हा नव्याने ओळख करून द्यावी लागते कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पोस्टर मध्ये ‘चलो रायगड, निर्धार परिवर्तनाचा’, असा सामाजिक संदेश दिला आहे. पण या पोस्टर मध्ये रायगड किल्ल्याच्या ऐवजी राजगड किल्ल्याचा फोटो वापरल्याने. राष्ट्रवादी पक्ष आणि जयंत पाटील यांच्यावर सामाजिक स्तरातून टीका होण्याची शक्यता आहे.

देशात भाजपा सरकार येऊन साडेचार वर्षांचा काळ झाला आहे. सत्तेवर येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाहीच उलट सर्वच स्तरांवर सरकार अपयशी ठरले आहे. लोकांच्या मनात आता परिवर्तन झालं पाहिजे, ही भावना आहे. ही लोकभावना ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन येत्या १० जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

दरम्यान चूक लक्षात येताच जयंत पाटील यांनी आता नवे पोस्टर ट्वीट केले आहे.