रविचंद्रन अश्विन आधुनिक गोलंदाजातील’दादा’

रविचंद्रन अश्विन:

स्वप्निल कडू– रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेट खेळायला सुरवात केल्यापासून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारताने आज श्रीलंकेविरोधात धमाकेदार विजय मिळवला. या कसोटीत अश्विनने 8 गडी बाद करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
अश्विनने डेनिस लिलीचा 56 कसोटीत 300 विकेट घेण्याचा विक्रम आज मोडीत काढला. अश्विनने केवळ 54 कसोटीत हा विक्रम आपल्या नावावर केला. यादरम्यान अश्विनने डेनिस लिली, शेन वॉर्न, मुरलीधरन, डेल स्टेन, डोनाल्ड यासारख्या दादा गोलंदाजाणा मागे टाकले आहे.
अश्विनने आजपर्यंत खेळलेल्या 54 कसोटीत एक उत्तम अष्टपैलू म्हणून सुरेख कामगिरी केली आहे.अश्विनने फलंदाजीत 4 शतकांसहित 31.55च्या सरासरीने 2051 धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. गोलंदाजीत अश्विनने एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम 26 वेळा केला आहे.एका कसोटीत 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही 7 वेळा केला आहे.अश्विनने आजपर्यंतच्या कारकिर्दीतीत 7 वेळा सामनावीर तर 7 वेळा मालिकावीर होण्याचा मान पटकावला आहे.
अश्विन सध्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत  चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विन सद्यस्थितीत जागतिक क्रिकेटमध्ये एक दादा गोलंदाज म्हणून नावारूपास आला आहे.भारतीय संघाच्या कसोटीत 1 नंबरचा संघ बनण्यात अश्विनचा  सिहाचा वाटा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'