‘ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ माकपाच्या माजी आमदाराने केले मोदी-फडणवीसांचे कौतुक

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आणि पुढचे पंतप्रधान तेच असल्याचे सांगितले.

सोलापुरात कष्टकरी कामगारांच्या ३० हजार घरांचा प्रकल्प आडम मास्तर यांनी उभा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा पायाभरणीस समारंभ मोदी यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. यावेळी बोलताना आडम मास्तरांनी मोदी-फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि आमचा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंजूर करून आणला. ‘ये छोटा घर गरीब के लिए बंगला ही है, अगर ये बनाने में सरकारने पुरा सहयोग किया तो ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ असे आडम म्हणाले. यापूर्वीचा दहा हजार घरांचा प्रकल्प माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारजी वाजपेयी यांनी मंजूर केला आहे. आताचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करण्यास मदत केल्याचेही आडम म्हणाले.

दरम्यान,विविध कामांच्या उद्घाटनासाठी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापुरात आले होते. नेहमीप्रमाणे यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. सोलापूरकरांनी आशीर्वाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांचे आभार मानले.

आमचे सरकार येण्यापूर्वी देशात ९० हजार किमीचे महामार्ग होते. आता ते १ लाख २३ हजार किमीचे झाले आहेत. याचाच अर्थ गेल्या साडेचार वर्षांत आम्ही ४० हजार किमीचे महामार्ग बनवले अशी माहिती मोदी यांनी दिली.आपल्या सरकार अधिक कार्यक्षम असल्याचं प्रमाण देताना विकासकामांची पायाभरणी तर आम्ही करतोच पण उद्धाटन देखील आम्हीच करतो असं ठासून सांगितलं

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली