fbpx

याही वर्षी पुण्यात पाहायला मिळणार भक्ती – शक्तीचा संगम

sambhaji bhide

पुणे : आता सर्वाना वेध लागले आहेत ते आषाढी वारीचे, आषाढी वारीसाठी पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. लाखो वारकरी दरवर्षी या दिंड्यात सहभागी होतं असतात .या दिंड्याचं ७ तारखेला पुण्यात आगमन होणार आहे. आणि याही वर्षी आपल्याला पुण्यात वारकरी,धारकरी संगम पाहायला मिळणार आहे.अशी माहिती संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठानचे पराशर मोने यांनी दिलीये.

या दिंडीत सहभागी होण्यासाठी सर्व धारकरी हे पुण्यातील जंगली महाराज मठ इथे ७ तारखेला एकत्र जमणार आहेत. त्यानंतर सर्व दिंड्यांचे प्रस्थान झाल्यानंतर शेवटची ही जी दिंडी असणार आहे ती धारकऱ्यांची असणार आहे. या दिंडीची सुरुवात जंगली महाराज यांच्या मठापासून होईल तर सांगता संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. या दिंडीमध्ये सुमारे १० हजार धारकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज मोने यांनी वर्तवला आहे. या पालखीच्या निमित्ताने भक्ती,शक्तीचा सुरखे संगम अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान मागील वर्षी देखील श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं अशीच दिंडी काढण्यात आली होती. मात्र या दिंडीत सहभागी होताना धारकरी हे शस्त्रे घेऊन दिंडीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता काही धारकऱ्यांवर या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.त्यामुळे हि धारकऱ्यांची दिंडी वादात सापडली होती.

सुषमा स्वराज यांना चांगला धडा शिकवा; ट्विटर युजरचा स्वराज यांच्या पतीला सल्ला