मोदींच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांंना पोलिसांनी धु धु धुतले

टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करावयास सोलापूरात आले होते. त्यावेळी जनतेने सरकारच्या विरोधात निदर्शने केली पण पोलिसांनी अत्यंत निष्ठुरपणे निदर्शने करणाऱ्याना लाथा बुक्यांनी मारहाण केली.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी काल देखील सोलापुरात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला होता. प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्वीटर वरून सरकारला ‘आम्ही सरकार विरोधात आंदोलन देखील करू शकत नाही का?’ असा प्रश्न विचारला आहे. सदर घटने बाबतचा व्हिडीओ कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्वीटर वरून व्हायरल केला आहे.

यात गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.