मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढलं

मुंबई : काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याने महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ आणखी वाढणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गीता भंडारी यांना नगरसेवकपद बहाल केलं जाईल. ज्यामुळे पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ९५ होणार आहे.

स्टेफी किणी यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेटाळलं. जातपडताळणी समितीच्या निर्णयाला या नगरसेविकेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवली.