महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर एक व्यक्ती फार काळ राहत नाही – फडणवीस

मुबंई – मुख्यमंत्रीपदावर महाराष्ट्रात एक व्यक्ती जास्त काळ टिकू शकत नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुंबईतल्या विक्रोळी येथे एका हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

एखाद्या प्रकल्पाचं भूमिपूजन ज्यांच्या हस्ते होतं त्यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येता येत नाही. पण मला भूमिपूजन आणि उद्घाटनाला येता आलं असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. विक्रोळीतल्या सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या हॉस्पिटलचं बांधकाम लवकर झालं की मी जास्त काळ पदावर राहिलो हे कळत नाही, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर माणूस फार काळ टिकत नाही हा इतिहास असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे तर्क – वितर्कांना उधाण आलंय.