fbpx

‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं’

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहेत. या दोघांनी त्यांची मैत्रीही तितकीच जपली. शरद पवार यांना ‘बारामतीचा म्हमद्या’ किंवा ‘मैद्याचे पोते’ अशा शेलक्या शिव्या हे आपल्या खास स्टाईलने देताना बाळासाहेब ठाकरेंना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पण तरीही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात कधीच कटूता आली नाही.

बाळासाहेबांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरेंचं पवारांवर किती प्रेम होतं हे सांगणाऱ्या आठवणीना उजाळा दिला. चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत विविध कार्यक्रमातून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्यातच, ‘आठवणीतले बाळासाहेब’ या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील आपल्या आठवणी सांगितल्या.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पवारांनी ज्यावेळी आवाज उठवला होता त्या काळातील आठवण पवारांनी शेअर केली आहे.

सीमाभागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुढाकार घेण्याची संधी मला बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली होती, त्यात मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं.साध्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याला मोठं करण्याचं स्वप्न बाळगणारं बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :