मराठा क्रांती मोर्चा : वाचा मराठा का पेटला…!

Maratha Kranti Morcha Maharashtra bandh

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अधिक मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. काल बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये उस्फुर्त बंद पाळल्यानंतर आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पालघर, बोईसर, रायगड, पनवेल, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आदी ठिकाणी बंद पाळला जात आहे.!
गेली ५८ अतिविराट मोर्चे जगाला आदर्श देणारे होते परंतु आता हेच मोर्चे हिसंक होऊ लागलेत. ह्या मागील कारणांचा शोध घेणे सोडून बेताल वक्तव्य दिल्याने ही आंदोलन चिघळत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांचे साप सोडण्याचे वक्तव्य असेल किंवा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वेगळेच तेवर असतील यांनी हा विषय आणि त्याच गांभीर्य वाढू लागले आहे. मराठा आरक्षण हा एकमेवच मुद्दा नसून यासाहित अजून बऱ्याचश्या मागण्या तश्याच प्रलंबित असल्याने हा भडका अजून उडत आहे.

सामान्य मराठा तरूण आता या प्रश्नासाठी आक्रमक होत आहे. त्याची सर्वाधिक घुसमट ही त्याचाच समाजातील लोकप्रतिनिधींच्या बोटचेपे धोरणामुळे होत आहे. जवळपास डझनभर त्याहून अधिक मंत्री व एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक आमदार, खासदार अशी लोकप्रतिनिधिंची ताकद असताना त्यांच्याच समाजातील बांधवाना आपल्या रास्त मागण्यांसाठी इतके प्रखर मोर्चे करावे लागतात, हेच निंदनीय असल्याची प्रातिनिधिक भावना आंदोलक मांडत आहेत. आपली खुर्ची व आपले पद यासमोर सगळंच मिथ्या असल्याचच जणू हे जवळपास २.५% पुढारलेले समाज बांधव दाखवून देत असल्याने मराठा तरुण खवळला आहे.

कोणत्याही समाजावर अन्याय न करता मागण्या मान्य करण्याची भूमिका असल्याने सरकारने तसेच लोकप्रतिनिधी यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. पर्यायाने जनतेच्या सध्याच्या आक्रोशाला आश्वासनांच गाजर देणारे सरकारच जबाबदार असल्याची भावना आंदोलकांना पूर्णतः सरकारविरोधी भूमिकेत घुसण्यास कारणीभूत आहे. मुस्लिम समाजास इतर अनेक समाजानी सुद्धा या मोर्चाना सक्रिय पाठिंबा दिल्याने समाजात कोणतीही जातीची तेढ निर्माण होतच नाही, असे मोर्चेकरी सांगत आहेत.

कोणत्याही हिंसेशिवाय मोर्चा असावा, हे जरी खरे असले तरी ५८ मोर्चे आत दाबलेला आवाज आता उफाळून बाहेर येत आहे आणि असेच चालू राहिले तर याची तीव्रता इतकी प्रचंड असेल की सगळीकडे राखेने रांगोळी काढली जाईल, यात सुतमात्रही शंका नसल्याचे किशोरवयीन तरुण मोर्चेकरी सांगत होते. किशोरवयीन मराठा तरुण या सर्व आंदोलनाचा अतिशय आक्रमक चेहरा म्हणून सरकारशी संघर्ष करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे.

“वारीत आहे आमचा बाप
आणि
फडणवीस म्हणतात हे सोडतील साप”

अश्या घोषणाबाजी देत आरक्षणसह इतर मागण्यांसाठी मराठा आता पेटला आहे. एकंदरीत, सरकार आंदोलांन भडकण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहेत का? की आंदोलनाची दिशा भरकटविण्यासाठी, याचा विचार मोर्चाने करायचा असून आपल्या भूमिकेवर ठाम असण्याची गरज आहे. तसेच आता मोर्चा कुणाच्याच हातात राहिला नसून समाजच्या हातात रुजला गेल्याने याची तीव्रता प्रचंड वाढण्याची शक्यता मोर्चातील चर्चेवरून दिसून येत आहे. मराठा समाजातील विद्यमान लोकप्रतिनिधीसह सरकारला या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे या मोर्चातून स्पष्ट होत आहे.

राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा : संजय राऊत

आमदार भारत भालके यांच्याकडुन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला एक लाखाची रोख मदत