मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणे यांचेच : खासदार संभाजीराजे

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणे यांचे आहे, राणे यांच्यामुळेच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाले आहे, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले. सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे महाराणा प्रताप कलादालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पूर्वी आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. सगळ्या मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम आम्ही केले. त्यावेळी आम्ही सर्वांनी लढा दिला. त्यानंतर मराठा आरक्षणाची जबाबदारी द्यायची कोणाकडे हा प्रश्न आला होता. त्यावेळीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आम्ही सर्व म्हटलो एकच कणखर माणूस तो म्हणजे नारायण राणे, त्यांनाच का हि जबाबदारी दिली तर म्हणजे आपल्या अंगाला काही लागायला नको. धाडसी निर्णय घेणार माणूस म्हणजे नारायण राणे आहेत. आज १६% आरक्षण मिळाल आहे ते हेच आहे. खर धाडस केले आहे ते नारायण राणे यांनीच, असे खासदार संभाजीराजे यावेळी म्हणाले.