‘भाषणाच्या ‘पावसाने’ पाण्याचा हंडा भरत नाही’

 बीड : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून बीड जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत भाजपावर टीका केली.

भाषणाच्या ‘पावसाने’ पाण्याचा हंडा भरत नाही ,खोटं बोलून अन्नदात्‍याची फसवणूक करून नका. ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकला ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकला, आम्ही मन की नाही तर जनची बातमी करतो. केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का ? असा प्रश्न ठाकरे यांनी जनतेला केला.

शेतीला पाणी नाही, गुरांना चारा नाही, युवकांना रोजगार नाही, पीकविमा योजना भरल्यावर नुकसान भरपाई मिळत नाही. मग कुठे देश बदलतोय, असा प्रश्न विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली.