भाजप सरकार राबवत असलेल्या योजना मनसेनेच्या ब्लू प्रिंटमधील

bala nandgavkar

सोलापूर: भाजप सरकार राबवत असलेल्या योजना मनसेने निवडणूक काळात जाहीर केलेल्या ब्लू प्रिंटमधील आहेत़. असा आरोप मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. कोल्हापूर आणि सोलापूरमधील पक्षस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर हे सोलापूर दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्राचा विकास हाच आजही आमचा अजेंडा आहे. राज ठाकरे गेली १२ वर्षे स्वत:च्या हिमतीवर पक्ष चालवत आहेत. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलताना नांदगावकर म्हणाले, ठाकरे कुटुंबाने कधी जातपात पाळली नाही. त्यामुळे मनसेने भिडे गुरुजींचे समर्थन करण्याचा अथवा न करण्याचा प्रश्न येत नाही. गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.