fbpx

भाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल

udhav thakre

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना बंगळुरुमध्ये बोगस मतदार ओळखपत्राचे प्रकरण समोर आलंय. दरम्यान भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर टीका केलीये.

बंगळुरुतील बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. पूर्वी जे काँग्रेस करायची ते आता भाजपा करत असून भाजपाने काँग्रेसला आत्मसात केले. आपलेच विचार आणि कार्य पुढे नेणाऱ्या भाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. भाजपाने काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करुन घेतले. हा विजय काँग्रेसचाच असून फक्त मेकअप करुन ते भाजपात आले, असेही शिवसेनेने यावेळी म्हटले आहे.

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला . बंगळुरुत बोगस मतदार ओळखपत्र सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. बंगळुरुत १० हजार बोगस मतदार ओळखपत्र सापडले असून या व्होटर फर्जीवाडावरुन निवडणुकीची खाली घसरलेली पातळी दिसते. पैशांचा वारेमाप वापर सुरु असून भाजपाकडे इतका पैसा कुठून येतो, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

कोणतीही निवडणूक आली की नोटांचा प्रवाह धो धो वाहू लागतो. नोटछपाईचे उद्योग ‘मुद्रा बँके’ने सुरु केले आहेत. हे पूर्वी काँग्रेस करायची. हीच कला आता भाजपाने आत्मसात केली. कर्नाटकमधील भाजपाचा जाहिरनामाही काँग्रेसकडून कॉपी केल्याचा आरोप होत आहे, अशी टीकाही यावेळी शिवसेनेने केली.

2 Comments

Click here to post a comment