बारावीचा इंग्रजीचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही

12th paper

पुणे : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घ्यावा अशी चर्चा सुरु होती. मात्र बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलं आहे. पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेपर सुरु होऊन एका तासातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळली आहे. त्यानंतर बोर्डाकडून हे स्पष्टीकरण दण्यात आलं आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मात्र शिक्षकांचं निवेदन मिळाल्यानंतर ते सरकारकडे पाठवलं जाईल. निकाल उशिरा लागणार नाही. शेवटी विद्यार्थीही त्या शिक्षकांचेच आहेत, असं शकुंतला काळे म्हणाल्या.

Loading...

काय म्हणाल्या शकुंतला काळे?

” पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल. या फोटोत दिसणारे काही प्रश्न हे इंग्रजीच्या पेपर मधले होते. या प्रकाराच्या मागे जे आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. वेळ पडल्यास सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात येईल. मुलांनी आणि पालकांनी घाबरून न जाता व्यवस्थित परीक्षा द्यावी. हा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही,” कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात येतील, असं स्पष्टीकरण शकुंतला काळे यांनी दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद