फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेआणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

या पेजच्या माध्यमातून आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आक्षेपार्ह मजकूर डिलीट व्हावा, तसेच हे पेज कायमचं बंद केलं जावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.