पॅनकार्ड क्लब्ज कंपनी गुंतवणूकदारांचे धरणे

अभिजित कटके

सोलापूर-  पॅॅनकार्ड क्लब्ज कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. सेबीने कंपनीची सर्व मालमत्ता सील करावी, या मागणीसाठी गुंतवणूकदार बुधवारी (ता. ३०) धरणे आंदोलन करणार अाहेत. गु्ंतवणूकदारांची संघटना असलेल्या राष्ट्रशक्ती गुंतवणूकदार समन्वय समितीचे प्रमुख विजय पवार यांनी पत्रकारांना दिली.

पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असा आदेश ‘सॅट’ कोर्टाने १२ मे २०१७ रोजी दिला होता. मात्र सेबीकडून मिळकतीच्या विक्रीची प्रक्रिया ही संशयास्पद असून मिळकतींची किंमत अव्यवहार्य आहे. त्याचे मूल्यांकन ५० ते ६० टक्के कमी केले. त्यामुुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.