पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवानांकडून चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये आज पहाटे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत असून भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानने २०१६ मध्ये २२८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण अधिक असून यावर्षी पाकिस्तानने २५० पेक्षाही अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काल (१५ ऑगस्ट) देखील पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते

You might also like
Comments
Loading...