पालिकेचा सफाई कर्मचारी पवना नदीत बुडाला; शोधकार्य सुरु

पिंपरी-चिंचवड: गणपती विसर्जना दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कंत्राटी सफाई कर्मचारी पिंपळेगुरव येथील पवना नदीपात्रात बुडाला आहे. गुरवारी चार वाजल्यापासून दोन बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शिवाजी कंधर शिंदे (वय अंदाजे 20 ते 21, रा. पिंपळेगुरव) असे बुडालेल्या कर्मचा-याचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे पिंपरी पालिकेचे सफाई कर्मचारी आहेत. पिंपळेगुरव येथील घाटावर गणपतीचे विसर्जन सुरु आहे. दुपारी चारच्या सुमारास शिंदे हे घाटावर आले होते. ते नदीपात्रात उतरले. नदीपात्रात भरपुर पाणी आहे. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडाले आहेत.चारच्या सुमारास अग्निशामक विभागाला याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहेत. चार वाजल्यापासून दोन बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरु आहे. 20 ते 25 कर्मचारी शोध घेत आहेत.