नांदेडचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी पवार यांना भाजप प्रदेशाध्यक्षांतर्फे श्रद्धांजली अर्पण

मुंबई  : भाजपचे नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी पवार यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शोक व्यक्त केला व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपसाठी प्रतिकूल काळ असताना संभाजी पवार यांनी निष्ठेने पक्षकार्य केले. नांदेड जिल्ह्यात भाजप रुजविण्यात व वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. समाजातील विविध घटकांशी चांगले संबंध ठेऊन पक्षाचा जनाधार बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नांदेडमध्ये पक्ष कार्यालय उभारणीस त्यांनी मदत केली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो