‘धडक’चं पहिल्याच दिवशी ‘सैराट’ कलेक्शन

Janhvi Kapoor and Ishaan Khattar's Dhadak

टीम महाराष्ट्र देशा- मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये ‘धडक’ चित्रपटातून डेब्यू करणार्या  जान्हवीसाठी २० जुलैचा दिवस खूपच खास ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केलं.दोघेही नवखे कलाकार आहेत. तरीही धडकने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ चित्रपटात आणि आलिया भट्टचा सुपरहिट चित्रपट ‘राजी’लाही मागे टाकले आहे. कारण, ‘धडक’ने या दोन्ही चित्रपटांचे पहिल्या दिवसांचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन तोडले आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ने पहिल्या दिवशी ७.४८ कोटींची कमाई केली होती. तर ‘धडक’ने ८.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

धडक देशात एकूण 2235 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असून दिग्दर्शक शशांक खेतान यांचे दिग्दर्शन असलेला मराठी चित्रपट सैराटचा ऑफिशिअल रिमेक आहे. कथा तिच असली तरी भव्य दिव्य सेट, राजस्थानी महाल-कोठ्या, मध्यमवर्गीय जीवनशैली, राजस्थानी संस्कृती, भाषा, परंपरा अशा अनेक गोष्टी धडकला वेगळं ठरवण्याचं काम करतात.

सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ

भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!