‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन

blank

टीम महाराष्ट्र देशा : मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘झिंग झिंग झिंगाट’चं हिंदी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होते. त्या नंतर यातील ‘पहली बार’ असं या गाण्याचं शीर्षक असून ‘याड लागलं’ या मराठी गाण्याचं हिंदी व्हर्जनच पाहायला मिळत आहे.

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री गाण्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. मात्र ‘धडक’चं शीर्षकगीत वगळता या दोन्ही गाण्यांमध्ये नाविन्य असं काहीच बघयला मिळत नसल्याची चर्चा सगळीकडे बघायला मिळते. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘झिंगाट’ गाण्यानेही प्रेक्षकांची निराशा केली होती.

अमिताभ भट्टाचार्य लिखित हे गाणं अजय- अतुलने संगीतबद्ध केलं आहे. गाण्यात ‘सैराट’च्याच अनेक दृश्यांची जशीच्या तशी कॉपी करण्यात आली आहे. या चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याला अनेकांनी नापसंती दर्शवली होती. त्यानंतर आता ‘याड लागलं’ गाण्याचं हे हिंदी व्हर्जन पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. येत्या २० जुलै रोजी ‘धडक’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….