fbpx

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन !

pankja win election in parali dist grampachat election

टीम महाराष्ट्र देशा- दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात येत्या १८ तारखेला संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथे होणारा दुसरा दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्यातच संत भगवानबाबांच्या स्मारकाच्या लोकार्पणाची घोषणा ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी त्यांच्या समर्थकांकडून सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुक तोंडावर असल्याने गर्दीसाठी सर्वतोपरी ताकद लावली जाण्याचा अंदाज आहे.

या वर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संत भगवान बाबांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्यात आलं आहे.. एका भव्य चौथऱ्यावर पाण्यावर उभी असलेली भगवान बाबांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. दोन टन वजनाची ही मूर्ती फायबरपासून बनवण्यात आली आहे. स्मारकाच्या बाजूला ध्यान मंदिर आणि भव्य गार्डनही उभारण्यात येणार आहे.

गाफील राष्ट्रवादीला पंकजा मुंडेंचा दणका!

भगवान गडावरील दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री परवानगी नाकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. म्हणूनच या वर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी भगवान बाबांचे भव्य स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे.

आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला