डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक; पोलिसांची चार पथके रवाना

डीएसकें

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलेलं संरक्षण दूर करण्याच स्पष्ट केल आहे. त्यामुळे डीएसकेंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

आज कोर्टात का घडले?

हायकोर्टाने संताप व्यक्त करत डीएसकेंचे पासपोर्ट जमा करण्याची सूचना दिली आहे. डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केली असून डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज दूर करतो अस हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

Loading...

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हायकोर्टाने आज डीएसकेंचे पासपोर्ट जमा करा अशा सूचना सर्व विमानतळांना तातडीनं देण्याचे आदेश दिले. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे.

डीएसकेंना बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीने कर्ज दिले होते. मात्र हायकोर्टाने बुलडाणा अर्बन वर सुद्धा ताशेरे ओढले, तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे ध्यानात ठेवण्यासही हायकोर्टाने सांगितले. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्ण तपासणी न करताच तुम्ही कर्ज द्यायला कसे तयार झालात, अशा शब्दात बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला हायकोर्टाने समज दिली.