जाणून घ्या कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना

आपल्याकडे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात श्री गणेशाची पूजा आणि आराधनेने करण्याची परंपरा आहे. मात्र गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी हा प्रश्न कायमच आपल्याला पडतो.

प्रतिष्ठापना अशी करावी…

श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट त्याच्या सभोवती मखर असावे पूजास्थाना वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्र , ताम्हण , समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे, गोड पदार्थ असावेत.

कोणत्याही मूर्तीमध्ये मंत्रांनी देवत्व येत त्यामुळे विधिवत मंत्र म्हणून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी. आवाहन, स्नान, पंचामृत स्नान, उष्णोदक स्नान असे स्नान गणपतीला फुलांनी पाणी शिंपडून करावे. त्यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा. हा अभिषेकसुद्धा फुलांनी पाणी शिंपडूनच करावा. त्यानंतर गंध, हळद-कुंकू, अक्षदा, शेंदूर फुले, दूर्वा, हार अशा उपचारांनी पूजा करावी. त्यानंतर आरती, नैवेद्य, मंत्रपुष्प म्हणून घरातल्या सर्वांनी मिळून त्याचा आनंद घ्यावा. आपल्याकडे जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस रोज सकाळ, संध्याकाळी गणपतीची पूजा आणि आरती होणे आवश्‍यक आहे.