जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर…..-महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा इशारा

आधी करनी सेना आता महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा चित्रपटाला विरोध

संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. पद्मावती चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच नव्या नव्या वादाला उफाळी येत होती. त्यामुळे पद्मावती आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे.

ट्रेलर रिलीज झाला आणि आणखी एका नवीन वादाला सुरुवात झाली महाराणा प्रताप बटालियन संघटनेने या सिनेमाला कडाडून विरोध केलाय. भन्साळी राणी पद्मावतीची कथा चुकीच्या पद्धतीने पडद्यावर आणत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसंगी थिएटर्समध्ये जाळपोळ करु, असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिला आहे.
याआधीही, करणी सेनेनं या चित्रपटाला आपला विरोध दर्शवला होता. पद्मावती सिनेमा आम्हांला दाखवल्याशिवाज सिनेमागृहात लावला जाऊ नये अन्यथा होणाऱ्या नुकसानाला आम्ही जबाबदार राहणार नाही… असा इशाराही करणी सेनेनं दिलाय.

राजस्थानात पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला विरोध झाल्यानंतर कोल्हापुरातील मसाई पठारावर सिनेमाचं शुटिंग सुरू सुरू असताना मार्च २०१७ मध्ये जवळपास ५० अज्ञातांनी येऊन सेटची जाळपोळ केली होती. सेटवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याने सेटला आग लागली. यावेळी या जमावाने सेटच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती

You might also like
Comments
Loading...