गौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात

नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्ती झालेला; भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर न्यायालयाच्या कचाट्यात सापडणार आहे. नवी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने गंभीरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

गंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअँलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँँड अँँम्बेसिडर  आहे. या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणुक दारांच्या पैसे लाटण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदिच्छादूत असल्यामुळे गंभीरही अडचणीत सापडला आहे.

रुद्रा ग्रुपने गंभीरच्या नावाखाली गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. मात्र, या कंपनीला आश्वासनांची पूर्तता करता आली नाही आणि त्यांच्यावर फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची गंभीरने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. साकेत न्यायालयाचे न्यायाधीश मनिष खुराणा यांनी गंभीरच्या अटकेचे आदेश दिले. याचिका फेटाळूनही गंभीर न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर न राहिल्याने हे आदेश देण्यात आले.

You might also like
Comments
Loading...