fbpx

केडगाव हत्याकांड : दगडफेकप्रकरणी 9 शिवसैनिक पोलिसांना शरण

Shivsena

अहमदनगर – शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे 7 एप्रिलला केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात सोबत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. होती. या प्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींपैकी 9 शिवसैनिक स्वत:हुन पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रावजी नांगरे, प्रफुल साळुंके, गिरीश शर्मा, सुनिल वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रय नागपुरे, योगीराज गाडे, राजेश सातपुते असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.