काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य

M-G-VAIDYA

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशातून कॉंग्रेसचा बिमोड करण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपचे कान मागील काही दिवसांपासून संघ टोचत आहे. यातच आता देशात सुदृढ लोकशाहीसाठी बलवान विरोधी पक्षही आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा आहे, असे प्रतिपादन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी सत्ताधारी भाजपला घराचा आहेर दिला. ते नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मा. गो. वैद्य ?
देशात लोकशाही सुदृढ करण्यासाठी दोन पक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताची कल्पना मला मान्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. त्या वेळीही मी हीच भूमिका व्यक्त केली होती. परंतु देशात काँग्रेस टिकणे आवश्यक आहे.

मतभेद विसरून एकत्र या, सत्तांतर निश्चित होईल – सिंग