कर्नाटकात मोदींच्या ‘अहंकारा’चा पराभव झाला – राहुल गांधी

नवी दिल्ली – सकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

दरम्यान  येडियुरप्पा यांनी राजनामा दिल्यानंतर कर्नाटकात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराचा पराभव झाल्याची  टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपने जनादेशाचा अवमान केला आणि केवळ अहंकारापोटी सत्ता स्थापन केली. या खेळीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाची फूस होती. देशातल्या प्रत्येक घटनात्मक संस्थेच खच्चीकरण करण्याची संघाची खेळी आहे. काँग्रेस जेडीएसच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या टेप्स बाहेर आल्या आहेत असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची कशी भाषा करू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी केला.

You might also like
Comments
Loading...