कमलनाथ सरकारने घातली ‘वंदे मातरम्’ म्हणायला बंदी

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशमध्ये दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीला व दर महिन्याच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची पद्धत आहे.मात्र आता कॉंग्रेस सरकारने कर्मचाऱ्यांना ‘वंदे मातरम्’ गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. कमलनाथ सरकारनं हा निर्णय घेतला आहे.‘वंदे मातरम्’ म्हणण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामं करा असे सांगत ही पद्धत मोडीत काढली आहे.

भोपाळमध्ये गेली १३ वर्षापासून सचिवालयाबाहेर ‘वंदे मातरम’ गीत म्हणण्यात येते पण यावर्षाच्या सुरुवातीला ते झालेले नाही.यावरून मात्र भाजपने कमलनाथ व कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.भाजपचे नेते उमा गुप्ता यांनी कॉंग्रेसवर सरसंधान सांधले आहे.‘वंदे मातरम्’ म्हणत देशासाठी स्वातंत्र्याची लढाई लढण्यात आली होती,कॉंग्रेसने वंदे मातरम् वर बंदी घालून त्यांची मानसिकता दाखवून दिले असले तरी हा निर्णय त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे. अशा शब्दात गुप्ता यांनी कॉंग्रेसवर टीका केली.