आर.आर.पाटील असते तर ‘त्या’ व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली असती

महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद केले वर्तन

नागपूर : कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले. याच मुद्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी असे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जरीपटक्यातील सिंधू मैदानात सोमवारी रात्री सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान ही प्रचंड खळबळजनक घटना घडली. महिला पोलिसांनी त्याचा ताबडतोब उत्तर देऊन संबंधित पदाधिकाऱ्याला जागेवरच इंगा दाखविला. हे वृत्त वायुवेगाने पसरल्याने पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Rohan Deshmukh

या गोष्टीचा एक महिला म्हणून आपण जाहीर निषेध करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी घेऊन या घटनेची त्वरित चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वर्दीतील महिला पोलीसासोबत जर अशी वर्तणूक होत असेल तर ही बाब सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी नक्कीच अशोभनीय आणि चिंताजनक असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच आज स्व. आर.आर.पाटील असते तर राज्याचे गृहमंत्री म्हणून कोणताही पक्षपात न करता त्यांनी असे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली असती, असेही सुळे यांनी स्पष्ट केले

Latur Advt
You might also like
Comments
Loading...