आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात दोन महिलांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : अवैध सावकारी करुन एक जणास आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी औरंगाबादच्या दोन महिलांसह पाच जणांवर १४ ऑगस्ट रोजी गंगापूर पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज एमआयडीसीमधील जागृत हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी वेदप्रकाश लालबहादूरसिंग गौतम( वय ४८) व त्यांचा मोठा भाऊ वेदविकास गौतम (वय ५०) हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांनी वडिलांवर उपचार करण्यासाठी २०११ मध्ये राजेश मोरे यांच्याकडून १० लाख, रंजना साटम यांच्याकडून १० लाख, रेश्मा पाटील १६ लाख व शकील सिध्दीकी व अमीर सिध्दीकी यांच्याकडून ९० लाख रुपये आठ टक्के व्याजाने घेतले होते. या दोन्ही भावांनी ९ ऑगस्ट २०१७ पर्यंत पाच पटीने पैसे परत केले. असे असताना मुद्दल बाकी असल्यांचे सांगुन मुद्दल व्याजासाठी वरील सावकारांनी पैशासाठी तगादा लावला. फिर्यादी वेदप्रकाश व त्याच्या कुटुंबियांना शिविगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. ही बाब सहन न झाल्याने ९ ऑगस्ट रोजी दुपारी कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या पुलावरून वेदप्रकाश व वेदविकास यांनी नदीत उड्या मारल्या. यात लहाना भाऊ वेदप्रकाश याचा बुडून मृत्यू झाला. तर मच्छिमारांनी वेदविकास याचे प्राण वाचविले. दरम्यान या प्रकरणी वेदविकास गौतम यांनी १४ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त सावकारां विरुध्द भा.दं.वि.कलम ३०६,५०४,५०६,३४ भादंवि सहकलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधीनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...