आजपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ

उस्मानाबाद इथं आजपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सायंकाळी चार वाजता होणार आहे. या नाट्यसंमेलनात एकपात्री महोत्सव, विविध नाटकं, प्रकट मुलाखत, गोंधळ आणि स्थानिक लोककलांचं सादरीकरण होणार आहे.