‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’

टीम महाराष्ट्र देशा- मी टू वादळाच्या भोवऱ्यात आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह असलेल्या बिग बी अमिताभचं नाव पुढे येत आहे. अर्थात अद्याप कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील असं टि्वट हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने केलं आहे.

भवनानीच्या टि्वटनंतर सिनेवर्तुळात एकच खळबळ माजली. आधी लोकांना सपना भवनानी हिच शोषणाची बळी आहे असं वाटलं. पण त्याबाबतही तिने स्पष्ट केलं की ‘मला अमिताभ यांचा कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी मी स्वत: ऐकल्या आहेत. या महिला पुढे येतील अशी मला आशा आहे.’

Latur Advt
You might also like
Comments
Loading...