अनंतकुमार हेगडे नालायक – सिद्धरामय्या

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराने वेग घेतला असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज अनंतकुमार हेगडे हे नालायक असून त्यांची सरपंच व्हायचीही लायकी नसल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. दरम्यान सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

सिद्धरामय्या बोलताना म्हणाले की, गरीबांसाठी आणि समाजवादासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक न्यायावर भाजपाचा विश्वास नाही. मोदी सरकारचे मंत्री असलेले अनंतकुमार हेगडे हे तर नालायक असून त्यांची सरपंच व्हायचीही लायकी नाही. मात्र, मोदींनी त्यांना केंद्रीय मंत्री बनवलं, अशा कठोर शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. एका निवडणूक रॅलीदरम्यान ते बोलत होते.

सिद्धरामय्या म्हणाले, सामाजिक न्यायाचा आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही. त्यांचा या विचारावर विश्वासच नाही. जर नरेंद्र मोदींनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर या देशात रक्तपात होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी भाजपला दिला.