Weather Update | एकीकडे वाढती थंडी तर दुसरीकडे पावसाची शक्यता, पाहा कुठं बरसणार पाऊस?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश ठिकाणी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे.

त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमानात चढउतार होताना दिसत आहे. अशात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

A low pressure area has formed in the Arabian Sea

दक्षिण तमिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. परिणामी पूर्वेकडून येणारे वारे तीव्र होणार आहे.

त्यामुळे दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील हवेतील आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. अशात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

तर पुण्यामध्ये दोन दिवस आकाश निरभ्र आणि दुपारनंतर काही अंशतः ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी भागामध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अनुभवायला मिळणार आहे.

या बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकतात.

Benefits of Cucumber

या बदलत्या वातावरणामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकतात. उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये देखील काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या बदलत्या वातावरणात काकडीचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते, हृदय निरोगी राहते, पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते.

त्याचबरोबर नियमित काकडी खाल्ल्याने केस आणि त्वचा देखील निरोगी राहू शकते. त्यामुळे या हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.