Tea Benifits : आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात चहाचे ‘हे’ प्रकार, जाणून घ्या

health benifits of tea

Tea Benifits  | तेजस भागवत | जगभरातील अनेक नागरिकांना चहा प्यायला आवडतो. चहाला अमृततुल्य देखील म्हटले जाते. अनेकांचा दिवसच सकाळी सकाळी चहा पिऊन सुरु होतो. आपल्या देशातील लोकांना चहाचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतील. आता तर थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे चहा पिण्याचे प्रमाण देखील वाढलेले पाहायला मिळते. आपल्याकडे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच असे म्हटले जाते.  चहाचे देखील अनेक प्रकार बाजारांमध्ये उपलब्ध असतात. आज आपण असेच काही चहाचे प्रकार पाहणार आहोत, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

ब्लॅक टी

ब्लॅक टी (काळा चहा) आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. खासकरून ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशी लोकं आपल्या आहारामध्ये ब्लॅक-टी चा समावेश करतात. ब्लॅक टी चे सेवन केल्यामुळे शरीराला फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. ब्लॅक टी प्यायल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

आल्याचा चहा

दूध न वापरता केलेला आल्याचा चहा आरोग्यासाठी एक नाही तर अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. आल्याचा चहा तयार करण्यासाठी आल्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्यावेत आणि ते पाण्यात उकळावेत. यामध्ये मध आणि लिंबाचा रस देखील मिसळता येऊ शकतो. आल्याचा चहा, जळजळ-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे उलटी, पोटाचे दुखणे, गुडघेदुखी यापासून आराम मिळण्यास मदत होते.

ग्रीन टी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरतो. ग्रीन टी पिण्यासाठी तुम्ही टी बॅग्सचा देखील वापर करू शकता. या चहाचे सेवन सकाळी आणि संध्याकाळी केले असता आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(महत्वाची टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करताना वैद्यकीय सल्ला घ्यावा.)

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.