Supriya Sule | ड्रग्स प्रकरणावर गृहमंत्र्यांनी फक्त भाषण नाही तर काहीतरी ॲक्शन घ्यावी – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरातील ससून रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) फरार झाला होता. काल मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नई मधून अटक केली आहे. त्यानंतर त्याने मोठं विधान केलं आहे.

मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं, असं ललित पाटील यांनी म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशात आता या प्रकरणावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Politics should not come into the issue of drugs – Supriya Sule

प्रसार माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “ड्रग्स प्रकरण कोणीही सहन करू नये. मी गेल्या अनेक वर्षापासून तंबाखू, गुटखा याच्या विरोधात आहे.

ड्रग्सच्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये. सत्तेत जे कोणी सरकार असेल त्यांनी या प्रकरणावर सखोल चौकशी करायला हवी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मी काल या प्रकरणावरची पत्रकार परिषद बघितली.

या प्रकरणावर त्यांनी भाषण करण्यापेक्षा ॲक्शन घेण्याची गरज आहे. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी.

आम्ही ड्रग्सच्या विरोधात आहोत, अशी महाराष्ट्राने देशाला दिशा द्यायला हवी. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे.”

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

“ड्रग्स प्रकरणामध्ये ललित पाटील हा एक फक्त मोहरा आहे आणि त्या मोहऱ्याचा वापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करताना दिसत आहे. हे सगळं अत्यंत दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रात येणारं ड्रग्स हे गुजरातमधून येतं. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का? महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उध्वस्त करायची, सध्या हे कारस्थान सुरू आहे.

हे सर्व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.