सुजय विखेंच्या ‘तुतारी वाजवा’ वक्तव्यावरून भाजपला फटका; राज्यातील मोठे नेते नाराज

Nilesh Lanke, Sujay Vikhe Patil, Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe। लोकसभा निवडणूक साठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी तुतारीला मत देण्यास सांगितले असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सुजय विखे म्हणाले की,”“काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे (आमदार मोनिकाताई राजळे) नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका”, असे म्हणत सुजय विखे यांनी भरसभेत हात जोडले. त्यांच्या या विधानामुळे भाजपमधील मोठे नेते नाराज झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नगरमध्ये सुजय विखे यांचा भाषणातील तोल सुटत चालला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विखेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरु आहे. अहमदनगरात भाजपला मोठे भगदाड पडल्याचे चित्र आहे. ‘तुतारी वाजवा’ वक्तव्यावरून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे.

भाजपचे सरचिटणीस सुनील रासने यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रासने म्हणाले,”पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे. गेल्या पाच वर्षात कधीही सुजय विखे यांनी नागरिकांचे फोन नउचलेले नाहीत तसेच मतदारसंघात ढुंकुण देखील पाहिले नाही. त्यामुळेच आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करत आहेत. परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती.” असा टोला रासने यांनी सुजय विखेंना लगावला.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’ असे म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

यानंतर आता ‘आमच्या नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे आवाहन सुजय विखे यांनी मतदारांना केल्याने भाजपमधील मोठे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke Lok Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.