मोदींचा चेहरा नव्हे ही भूताटकी आहे, लोकं आता घाबरायला लागले – संजय राऊत

मोदींचा चेहरा नव्हे ही भूताटकी आहे, लोकं आता घाबरायला लागले - संजय राऊत

Sanjay Raut vs Narendra Modi Chhatrapati Sambhaji Nagar |  संजय राऊत (Sanjay Raut) हे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर लोकसभेची जागा लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत संभाजी नगरात आले. यावेळी त्यांनी मोदींवर हा हल्ला चढवला

राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सांगतात आमच्याकडे मोदीसारखा चेहरा आहे. तो एवढं भयंकर चेहरा आहे की, लोकं घाबरायला लागलेत. जसे शोलेमध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आजयेगा, त्याप्रमाणे कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील. याला चेहरा म्हणतात? ही भुताटकी आहे. हा चेहरा नकोय आता लोकांना, इतकी भयंकर कांड 10 वर्षात केलंय या लोकांनी, असे राऊत म्हणाले.

400 पार लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का?, जनता ठरवेल मोदी ठरवू शकत नाही. मोदींनी 200 जिंकल्या तरी खूप झाल्या. मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. नरेंद्र मोदींच्या पक्षाचे जो खाता आहे. त्याची यादी पाहिली तर कत्तलखण्याकडून गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्यांकडून 550 कोटी देणग्या घेण्यात आल्या आहेत, असे राऊत म्हणाले.

ऑलिम्पिक जर खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल. फेकू चॅम्पियन असून, राष्ट्रीय स्तरावर फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी आणि अंपायर म्हणून शाह घ्यावं लागेल. एक नंबरचं खोटारडा प्रधानमंत्री आहे. संभाजीनगरमध्ये खैरेंची हवा सुरू आहे, म्हणून विरोधात उमेदवार मिळत नाही असेही राऊत म्हणाले.

अवतारी पुरुष आहे तर मग देशातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या का देत नाही? गंगेत प्रेते वाहत होती तेव्हा अवतारी पुरुष थाळ्या वाजवायला सांगत होता. भाजप हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. मला अटक केली. काय उखडलं? भगवा फडकवत गेलो. भगवा फडकवत आलो.

हा देश हुकूमशाही समोर कधीच झुकला नाही. हुकूमशाहाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त 10 टक्के मतदान वाढवा. ईव्हीएम घोटाळा संपून जाईल. ईव्हीएम घोटाळा संपल्यावर मोदींचा पक्ष ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाही, असा दावाच राऊत यांनी केला.

Sanjay Raut vs Narendra Modi Chhatrapati Sambhaji Nagar

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.