fbpx

सलमाननं बाप्पाला दिला वाजतगाजत निरोप, लेझिमवर धरला दबंगने ताल

टीम महाराष्ट्र देशा : वाजत गाजत आलेल्या बाप्पांना दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महाराष्ट्रात विसर्जन करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपतीचं मंगळवारी विसर्जन करण्यात आलं. दरवर्षी दीड दिवसांसाठी सलमानच्या घरी बाप्पाचे आगमन होत असतं. यावर्षीही अगदी उत्साहात त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

तसेच विसर्जनादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात सलमाननं आपल्या बाप्पाला निरोप दिला. तर सलमानच्या घरच्या बाप्पाच्या आरतीमध्ये बॉलिवूडमधल्या अभिनेत्यांसह अभिनेत्री कतरिना कैफ ही सुद्धा उपस्थित होती. कॅटनं बाप्पाची आरतीही केली. दरम्यान, गणपतींना निरोप देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी ऐन उत्साहाच्या दिवसांमध्ये मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.