fbpx

संत एकनाथ महाराजांच्या पालखीत हजारो वारकरी, भाविक झाले सहभागी…

पैठण / किरण काळे-  संत एकनाथांच्या पालखीचे तिसरे रिंगण नांगरडोह (ता.परंडा) जि.उस्मानाबाद येथे रविवारी दुपारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या व विठू माऊलीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडले.
दरवर्षी प्रमाणे पंढरपूर आषाडी वारी पालखी सोहळ्या निमीत्त पाच जुलै रोजी पैठण येथुन संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.पैठणहुन शेवगाव,पाथर्डी,पाटोदा,जामखेड,खर्डा,दांडेगाव मार्गे नांगरडोह (ता.परंडा) येथे रविवारी दि.१५ जुलै रोजी दुपारी दाखल झाली. यावेळी गावकर्यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. फटाक्याच्या आतषबाजीत तोफांची सलामी देत वाजत गाजत पालखी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी ठेवण्यात आली. यावेळी पंचक्रोशितील हजारो वारकरी व भाविक यांनी दर्शन घेतले. दुपारी एक वाजेच्या सुमारास रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली.

यावेळी पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पुजन करण्यात आले. नाथांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा बघुन भाविक आनंदी झाले.या रिंगण सोहळा प्रसंगी बोला पुंडलीकवरदा जय हरी, श्री.ज्ञानदेव तुकाराम, संत नामदेव तुकाराम, शांतीब्रम्ह संत श्री.एकनाथ महाराज की जय या जयघोषात संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता.भाविक भक्तीरसात न्हाहुन निघाले.नाथांचा जयघोष करत वारकरी,टाळकरी,मृदंग वादक,विणेकरी,महिला भाविकांनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन बेफान होऊन रिंगण पुर्ण करण्यासाठी वारकरी रिंगणाभोवती धावत सुटले होते. अश्वचालक महेश सोणवने याने अश्व रिंगणात पळविले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी औरंगाबाद,बिड,उस्मानाबाद येथुन भाविक तिसरा रिंगण सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते.

शासनाचे आरोग्य पथक नावालाच…

औरंगाबाद जि.प.आरोग्य विभागाचे नाथ पालखी दिंडी सोहळ्याकडे दुर्लक्ष झाले असुन सुविधांचा अभाव दिसुन आला.जिल्हा प्रशासनामार्फत नाथांच्या पालखीला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे अश्वासन प्रशासनाकडुन देण्यात आले होते.आरोग्य पथकासोबत म्हणावा तसा औषध साठा पाठविण्यात आला नसल्याचे आढळुन आले.जि.प.आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारीही कामचुकारपणा करत असुन वेळेवर आरोग्य सेवा पुरवित नाहीत.गोळ्या औषधी वाटपाचेही नियोजन शुन्य असुन एका बाजारच्या पिशवी मध्ये ते मेडीकल ठेवलेले असुन गोळ्या बरोबर वितरीत होत नसल्याचेही वारकर्यांनी सांगितले.


विश्व हिंदु परिषदेची आरोग्य सेवा कार्य उल्लेखनीय….

शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज पालखी सोबत विश्व हिंदु परिषदेच्या दोन रूग्णवाहिका उपलब्ध असुन त्यामध्ये दोन पुरूष व दोन महिला डाँक्टर व परिषदेचे सेवेकरी उपलब्ध असुन. त्यांच्याकडुन वारकर्यांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्यात येत असुन गोळ्या,औषध,सलाईन,इंजेक्शन आदी आजारावर तात्काळ जागेवरच सोयी सुविधा उपलब्ध असुन विश्व हिंदु परिषदेचे डाँ.कुलकर्णी,डाँ.सोणवने, गोडबोले काका यांच्या समर्थ नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात परिषदेचे आरोग्य पथक वारकर्यांची नि;शुल्क सेवा करत असुन वारकरी समाधानी असल्याचे नाथवंशज पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी बोलतांनी सांगितले….

1 Comment

Click here to post a comment