मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; Rohit Sharma चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार होणार!

Rohit Sharma Can Captain CSK If MS Dhoni Retires

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी फ्रेंचायसीवर टीका केली आहे. तर फॅन्सने Mumbai Indians ची जर्सी जाळत निषेध नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परत येत कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली आहे.

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर अंबाती रायडू म्हणाला, ‘आयपीएल 2022 पूर्वी पंड्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते. त्यानंतर तो गुजरात टायटन्स (GT) या नव्या संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली जीटीला पहिल्या सत्रात चॅम्पियन बनता आले, तर सलग दुस-याच हंगामात संघ उपविजेता ठरला. असे असले तरी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे हार्दिक पंड्यासाठी सोपे नसेल.’

पुढे बोलतांना रायडू म्हणाला, ‘मला वाटते Mumbai Indians ने कर्णधार बदलण्यात घाई केली. पंड्याला कर्णधार बनवण्यापेक्षा यंदाच्या हंगामात Rohit Sharma कडे नेतृत्व कायम ठेवणे महत्वाचे होते. Hardik Pandya याने पुढच्या वर्षी कर्णधारपद स्वीकारले असते तर बरे झाले असते, कारण रोहित अजूनही टीम इंडियाचा कर्णधार आहे.

Rohit Sharma Can Captain CSK If MS Dhoni Retires

Rohit Sharma आणखी 5 ते 6 वर्षे खेळू शकतो. आयपीएल 2025 स्पर्धेत रोहितने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावं. एमएस धोनी निवृत्त झाला तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व रोहितने करावे. मी रोहित शर्माला सीएसकेचा कर्णधार होण्याची वाट पाहात आहे.

रोहित शर्मा यावेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दुसरीकडे, 2025 लिलावात रोहित शर्मा दिसला तर चेन्नई सुपर किंग्स त्याला खरेदी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Mumbai Indians New Jersey

IPL 2024 ला कर्णधार बदल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने जर्सीही बदलली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली जर्सी लाँच केली. ही जर्सी प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंह यांनी डिझाईन केली आहे. मुंबई इंडियन्सच्या जुन्या जर्सीप्रमाणेच नव्या जर्सीचा रंग निळा आहे. तर निळ्या रंगाच्या जर्सीवर खांद्याच्या बाजूला सोनेरी पट्टे आहेत. नवीन जर्सीवर एम हे अक्षर संपूर्ण जर्सीमध्ये तुम्हाला दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.