fbpx

पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात

टीम महाराष्ट्र देशा:-पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आह्रे. या अपघातामध्ये ६ प्रवासी ठार झाले,तर २० प्रवासी जखमी झाले आहेत.सातारा शहरानजीक असलेल्या डिमार्ट जवळ हा अपघात झाला आहे. जखमींचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातातील मयत आणि जखमी प्रवासी कर्नाटकातील असल्याचे समजत आहे. ती बस बेळगावला जात होती.

पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकमागेच प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल बसही जात होती. दरम्यान, सातारा शहरानजीक असलेल्या डिमार्ट जवळ अचानक ट्रकचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला.हा रस्ता तीव्र उताराचा आहे. यावेळी भरधाव असलेली ट्रॅव्हल बस पाठीमागून ट्रकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत.

महामार्गांवर होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाहतूक नियम न पाळणे हेही यातील एक कारण मानले जात आहे. याला आळा बसण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवा मोटार वाहन कायदा देखील आणला आहे. मात्र, अजूनही त्याची पुरेशी अंमलबजावणी होत नाही.