Manoj Jarange यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांनी काल दिले होते कारवाईचे संकेत

beed And Amalner Police Fir Against Manoj Jarange Patil For Rasta Roko Protesting Without Police Permission Maratha Reservation Agitation

Manoj Jarange | सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले होते. त्यानंतर मराठा समाजाने विना परवानगी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यात १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यात ४२५ जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तसेच विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

Police Fir Against Manoj Jarange Patil

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंवर पोलीस कारवाईचे संकेत काल पत्रकार परिषदेत दिले होते. ते म्हणाले होते की, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.