चांगले काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही; Nitin Gadkari यांचे व्यक्तव्य चर्चेत

'Person who does good work never gets respect', says Nitin Gadkari

Nitin Gadkari । दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदारांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यासाठी एका कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रमात गडकरी यांनी संधीसाधू नेत्यांचा समाचार घेत टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवण्याच्या इच्छेवर चिंता व्यक्त करत विचारधारेचा ऱ्हास होणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नसल्याचे सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले की, “आपल्या विचारसरणीच्या जोरावर ठामपणे उभे राहणारे लोक आहेत, मात्र अशा लोकांची संख्या कमी होत आहे. विचारसरणीची घसरण लोकशाहीसाठी चांगली नाही.

ना उजव्या विचारसरणीचे, ना डाव्या पक्षाचे, आम्ही प्रसिद्ध संधिसाधू आहोत, असे काही लोक लिहितात आणि सर्वांना सत्ताधारी पक्षाशी जोडले जावेसे वाटते.”

Person who does good work never gets respect – Nitin Gadkari

पुढे बोलतांना गडकरी म्हणाले, ””मी नेहमी गमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट निश्चित आहे की, चांगले काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि जो वाईट काम करतो त्याला कधीही शिक्षा होत नाही.

राजकारणी येतात आणि जातात पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी केलेले काम शेवटी महत्त्वाचे असते आणि चांगले काम केलेल्या त्याच लोक प्रतिनिधींना आदर मिळतो.

यावेळी गडकरींनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या बोलण्याच्या कलेची प्रशंसा केली तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या वागण्या, साधेपणा आणि व्यक्तिमत्त्वातून खूप काही शिकल्याचे सांगितले. अटलबिहारी वाजपेयींनंतर मी ज्या व्यक्तीने सर्वात जास्त प्रभावित झालो ते जॉर्ज फर्नांडिस होते, असे गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.